‘लोकमत’चे दीपक भातुसे, प्रगती पाटील यांना पत्रकारिता पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:56 IST2025-01-24T10:55:50+5:302025-01-24T10:56:07+5:30

Mumbai News: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या दोन वर्षांच्या विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात आयोजित समारंभात करण्यात आले.

Journalism awards to Deepak Bhatuse and Pragati Patil of 'Lokmat' | ‘लोकमत’चे दीपक भातुसे, प्रगती पाटील यांना पत्रकारिता पुरस्कार

‘लोकमत’चे दीपक भातुसे, प्रगती पाटील यांना पत्रकारिता पुरस्कार

मुंबई - मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या दोन वर्षांच्या विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात आयोजित समारंभात करण्यात आले. ‘लोकमत’ मुंबईचे विशेष प्रतिनिधी दीपक भातुसे यांना संघाच्या सदस्यांसाठीचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ तर ‘लोकमत’ साताराच्या उपसंपादक प्रगती जाधव पाटील यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ देऊन दोघांनाही गौरविण्यात आले.

अजित पवार यावेळी म्हणाले की, एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच प्रसिद्धी माध्यमांनी बातमी द्यावी. बऱ्याचवेळा वाचकप्रियता वाढविण्यासाठी बातमीला सनसनाटी स्वरूप देण्याचा प्रयत्न होतो, तो टाळावा. पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत, प्रतिमा जोशी, संदीप आचार्य, विनया देशपांडे, मंदार गोंजारी, राजन शेलार यांनाही गौरविण्यात आले.

Web Title: Journalism awards to Deepak Bhatuse and Pragati Patil of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.