काल पक्षात आले, लगेच मिळाली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:32 IST2025-12-31T14:32:03+5:302025-12-31T14:32:29+5:30
शिवडीतील उद्धवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना प्रभाग २०४ मधून उमेदवारी न मिळाल्याने शिंदेसेनेत प्रवेश करून लगेच उमेदवारी मिळविली.

काल पक्षात आले, लगेच मिळाली उमेदवारी
महेश पवार -
मुंबई : उद्धवसेना-मनसे युती, काँग्रेस-वंचित आघाडी, भाजप-शिंदेसेना युती तर राष्ट्रवादीची (अजित पवार) स्वतंत्र लढत अशा बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अनेकांनी उमेदवारीसाठी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेश करताच काहींना थेट उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत असंतोष वाढला आहे.
उद्धवसेना-मनसे युतीमध्ये १९२ प्रभाग मनसेला गेला. येथून मनसेने यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्याने पक्षाच्या सरचिटणीस स्नेहल जाधव व उद्धवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी रात्री उशिरा शिंदेसेनेत प्रवेश केला. पाटणकर यांच्या पत्नी प्रीती पाटणकर यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिल्याने विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर नाराज झाले. पक्षासाठी झटणाऱ्या वाडेकरांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवडीतील उद्धवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना प्रभाग २०४ मधून उमेदवारी न मिळाल्याने शिंदेसेनेत प्रवेश करून लगेच उमेदवारी मिळविली.