Join us  

Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:04 PM

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडाच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालेले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करु असा इशारा देखील भाजपाने दिला होता. तसेच पोलीस या प्रकरणातील दोषींवर अजूनही कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र या मारहाण प्रकरणातील ५ जणांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या ५ जणांना १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Jitendra Awhad: त्याला मारलं ते चांगलंच केलं, कारण...; आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं 'मनसे' समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पत्र; मारहाणीच्या घटनेवरून काही प्रश्न!

दरम्यान, फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली होती. राजकीय वर्तुळातून देखील आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी लोकमतशी चर्चा केली. एखाद्या मंत्र्याने अशा पध्दतीने कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला असता, आव्हाड म्हणाले की, मी कधीच कायदा हातात घेत नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

'निश्चितच तुझे हातपाय मोडले असते', जितेंद्र आव्हाडांना पोलीस अधिकाऱ्याची धमकी

गेल्या तीन-चार दिवसांपासून सदर मनुष्य अश्लील शिविगाळ करत आहे. माझ्या मुलीवर, बायकोवर बलात्कार करणार, अशा धमक्या देतो. माझ्याच नावाचे फेक अकाऊंट तयार करतो. माझा दाभोळकर होणार म्हणून ट्विट केले जाते. एक माणूस अमरावतीवरुन येतो. तो सांगतो, आम्ही थेट गोळ्या घालतो डोक्यामध्ये, त्यामुळे कोण कायदा हातात घेतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात मी अशा पोस्टकडे कधीच लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे, हेच मी कार्यकर्त्यांनाही सांगत असतो असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडपोलिसठाणे