Join us  

Jitendra Awhad: सलमानसंग दिसले जितेंद्र आव्हाड, इफ्तार पार्टीत सेलिब्रिटींचा थाटमाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 3:37 PM

बाबा सिद्दिकी यांच्या घरी यंदाही पार्टी रंगली आणि शाहरूख-सलमाननं आवर्जुन हजेरी लावली.

मुंबई - काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी मुंबईत रंगते. कारण, या पार्टीला अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी हजेरी लावतात. विशेषत: दोन चेहरे तर हमखास दिसतात. एक म्हणजे, सलमान खान आणि दुसरा म्हणजे शाहरूख खान (Shah Rukh Khan). दरवर्षी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी रमजान महिन्यात या पार्टीचं आयोजन करतात. कोरोना लॉकडाऊनमुळे 2 वर्षांनी या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं असून या पार्टीत सलमानसंग गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही दिसून आले. 

बाबा सिद्दिकी यांच्या घरी यंदाही पार्टी रंगली आणि शाहरूख-सलमाननं आवर्जुन हजेरी लावली. सलमान तर पार्टीत नेहमीच्याच मूडमध्ये दिसला. पण शाहरूखचा मूड मात्र काहीसा गेलेला दिसला. साहजिकच सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली. सलमानचे आगमन होताच, मीडियाला पोझ देण्यासाठी तो कॅमेऱ्यासमोर थांबला होता. त्याचवेळी, बाजुला उभे असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनाही सलमान हात दिला. त्यानंतर, सलमान आणि आव्हाड हे एकाच फ्रेममध्ये झळकले. तितक्यात बाबा सिद्दिकी हे सलमानच्या स्वागताला आले. यावेळी, आव्हाड यांचेही जादू की झप्पी देत त्यांनी स्वागत केले.  

शाहरुखचा व्हिडिओ व्हायरल

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शाहरूख व बाबा सिद्दीकी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील शाहरूखचं वागणं नेटकऱ्यांना जरा वेगळं वाटलं. मग काय नेटकऱ्यांनी आपआपल्या परीने अंदाज बांधला. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे. पार्टीत शाहरूख व बाबा सिद्दीकी स्टेजवरून जात असतात आणि अचानक बाब सिद्दीकी शाहरूखला फोटोसाठी थांबवतात. शाहरूख त्यांच्या विनंतीला मान देत, फोटो तर काढून घेतो. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब दिसतं. मीडियाला तो हात हलवत अभिवादन करतो, पण त्यात नेहमीचा जोश नसतो. नेमकी हीच गोष्ट  नेटकऱ्यांनी हेरली. मग काय, त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

नेटीझन्सने बांधलेला अंदाज अपना अपना

‘शाहरूखला कदाचित मीडियाला पोझ देण्याची इच्छा नाहीये,’असं एकाने लिहिलं. आज कदाचित शाहरूखचा मूड ठीक नव्हता, अशी कमेंट अन्य एका युजरने केली. काही युजरने याचा संबंध थेट आर्यन प्रकरणाशी जोडला. ‘आर्यन प्रकरणात मीडियाने त्याला प्रचंड त्रास दिला. कदाचित म्हणून त्याला मीडियाला पोझ देण्याची इच्छा नसावी,’ असं मत एका युजरने मांडलं. काहींना बाबा सिद्दीकींचं वागणंही खटकलं. त्यांनी ज्या पद्धतीने शाहरूखला थांबवलं, त्यामुळे तो संतापल्याचा अंदाज अनेकांनी बांधला.

टॅग्स :मुंबईजितेंद्र आव्हाडकाँग्रेससलमान खान