जेटचे कर्मचारी हवालदील; संकटाची मालिका संपेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 02:47 IST2019-03-25T02:47:36+5:302019-03-25T02:47:46+5:30
आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लाष्ठ निघण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती बिघडललेली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत.

जेटचे कर्मचारी हवालदील; संकटाची मालिका संपेना
मुंबई : आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लाष्ठ निघण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती बिघडललेली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे घर कसे चालवायचे या विवंचनेत जेटचे कर्मचारी पडले आहेत.
जेटच्या कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नसल्याने वैमानिक, तंत्रज्ञ व केबिन क्रू सहित सर्व विभागातील कर्मचाºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कंपनीचे भवितव्य अधांतरी असल्याने भविष्याबाबत कर्मचाºयांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे. काही वैमानिक मध्यंतरी दुसºया कंपनीमध्ये नोकरीसाठी मुलाखती देऊन आले मात्र इतर कर्मचाºयांना विमान वाहतूक क्षेत्रात सध्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने त्यांना कंपनी बंद पडल्यास आपल्या रोजगाराचे काय होईल हा प्रश्न पडला आहे.
कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाºयांनी घर, वाहन खरेदी साठी मोठे कर्ज घेतले आहे. वेतनाचा मोठा हिस्सा या कजार्ची परतफेड करण्यासाठी खर्च होतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन होत नसल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ज्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात बचत केलेली होती त्या कर्मचाºयांनी आर्थिक व्यवस्था करण्यासाठी बचत खात्यातून पैसे काढण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र जे नवीन कर्मचारी होते व ज्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात बचत नव्हती त्यांना आपल्या नातेवाईक व मित्रांकडून उधार घेण्याची वेळ आली आहे. नवरा बायको दोन्ही कमावत्या व्यक्ती एकाच कंपनीत असल्याने व वेतन होत नसल्याने अशा कुटुंबांना तर मोठा आर्थिक धक्का बसला आहे. कंपनीने या परिस्थितीतून लवकर बाहेर पडावे व पूर्वीप्रमाणे कारभार सुरळीत व्हावा अशी प्रार्थना केली जात आहे. आर्थिक कोंडीतून बाहेर निघण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी कर्मचाºयांमधून करण्यात येत आहे.