जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा - भागवत कराड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:27 IST2021-09-06T08:27:10+5:302021-09-06T08:27:47+5:30
कराड म्हणाले, शेतकरी, मजूर, युवकांच्या उन्नतीसाठी सरकारचे काम सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. मात्र, त्याचबरोबर पीक विमा योजनेत मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे

जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा - भागवत कराड
नेवासा (अहमदनगर) : गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. अख्तर यांनी टीका करण्यापूर्वी संघ समजून घेण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले. मंत्री कराड यांनी रविवारी सकाळी श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासा) येथे भेट देऊन दत्त दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.
कराड म्हणाले, शेतकरी, मजूर, युवकांच्या उन्नतीसाठी सरकारचे काम सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. मात्र, त्याचबरोबर पीक विमा योजनेत मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुद्रा योजनेत युवकांना कर्ज मिळत नसल्याबाबत तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने लवकरच सर्व बँक अध्यक्षांची बैठक बोलावणार आहोत, असे कराड यांनी सांगितले.