जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांचे आता ३ नोव्हेंबरपासून उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:18 IST2025-10-28T07:18:02+5:302025-10-28T07:18:15+5:30
सुट्टी अन् मोर्चामुळे पाेलिसांनी परवानगी नाकारली

जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांचे आता ३ नोव्हेंबरपासून उपोषण
मुंबई :मुंबई महापालिकेने सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. याच्या निषेधार्थ जैन मुनी निलेशचंद्र विजय आझाद मैदानात ३ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार आहेत. १ नोव्हेंबरला आझाद मैदानात उपोषणाला बसण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हे उपोषण २ दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. निलेशचंद्र विजय यांनी १ नोव्हेंबरला आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी मात्र त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. सुटीचा दिवस आणि महाविकास आघाडी तसेच मनसेचा नियोजित मोर्चा या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. यामुळे १ नोव्हेंबरचे नियोजित उपोषण जैन मुनींनी ३ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले.