Join us

खडसेंवर केसेस असताना त्यांना पद देणे उचित ठरले नसते - दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 09:16 IST

पक्षात त्यांचे कोणीही दुश्मन नव्हते. त्यांच्या संदर्भात काही केसेस आहेत, त्या प्रलंबित असतानाच त्यांना काही दिले असते तर माध्यमांनीच टीका केली असती. आज ते ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनीही या प्रकरणांमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती...

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी, राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा खडसे यांचा निर्णय हा भाजपपेक्षा खडसेंसाठी अधिक दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षासाठी त्यांनी योगदान दिले आणि पक्षानेही त्यांना खूप काही दिले. एकेकाळी मंत्रिमंडळातील अर्धी खाती त्यांच्याकडे होती. त्यांच्या राजीनाम्यावरच नाही तर पक्षात नेहमीच चिंतन हे केलेच जाते.

पक्षात त्यांचे कोणीही दुश्मन नव्हते. त्यांच्या संदर्भात काही केसेस आहेत, त्या प्रलंबित असतानाच त्यांना काही दिले असते तर माध्यमांनीच टीका केली असती. आज ते ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनीही या प्रकरणांमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, याकडे दानवे यांनी लक्ष वेधले. ते आमचे मित्र आहेत, दिल्याघरी सुखी राहावे, असेही दानवे म्हणाले. माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की, भाजपमध्ये खडसेंना जी किंमत होती ती राष्ट्रवादीत मिळणार नाही. घेतलेल्या निर्णयाचा त्यांना निश्चितच पश्चाताप होईल. 

टॅग्स :रावसाहेब दानवेभाजपाएकनाथ खडसे