शनिवारसह रविवारी मुंबईत पाऊस पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:54 IST2018-04-07T03:54:53+5:302018-04-07T03:54:53+5:30

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता शनिवारसह रविवारी मुंबईवरील आकाश सामान्यत: ढगाळ राहील; शिवाय येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

 It will rain in Mumbai on Saturday with Saturday | शनिवारसह रविवारी मुंबईत पाऊस पडणार

शनिवारसह रविवारी मुंबईत पाऊस पडणार

मुंबई - राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता शनिवारसह रविवारी मुंबईवरील आकाश सामान्यत: ढगाळ राहील; शिवाय येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २३ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्याचा विचार करता ७ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ एप्रिल रोजी दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ आणि १० एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल़

Web Title:  It will rain in Mumbai on Saturday with Saturday