Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सत्तेच्या मस्तीचा फुगलेला फुगा फोडायला वेळ लागणार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 16:57 IST

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा मुंबईतील वरळी येथे राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

मुंबई- आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा मुंबईतील वरळी येथे राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन होणार आहे, या पार्श्वभूमीवर आज राज्यव्यापी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सत्तेच्या मोहापायी लाचार मिंधे भाजपसोबत गेले आहेत. मला  संताप या गोष्टीचा येतो, त्यांची नेते आपल्या घरात येऊन फोडापोडी करत आहेत, त्यांना मला एकच सांगायचं आहे, स्टॅलिन यांनी फक्त इशारा दिला आहे, आम्ही तो महाराष्ट्रात आमलात आणू, तुमची सत्तेच्या मस्तीचा फुलगेला फुगा फोडायला वेळ लागणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. 

कडक उन्हामुळे 'या' राज्यातील सरकार चिंतेत, तिसऱ्यांदा वाढवली शाळांची सुट्टी

"तुमची सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर ती मस्ती मनीपुरमध्ये दाखवा. तिकडे ईडी, सीबीआयचे लोक पाठवा. अमित शहांना सुद्धा लोक जुमानत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनीपुरमध्ये जायला तयार नाहीत पण अमेरिकेत जायला तयार आहेत. पीएम मोदींनी एकदा मनीपुरमध्ये जाऊनच दाखवावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, ठाण्यात महिला गुंड तयार झालेत. महिला नेत्यांवर हल्ले केले जातात. आता इथून पुढे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. शिवसेने पुढील हे आव्हान पहिलं नाही, याअगोदरही अशी आव्हान आम्ही पाहिले आहेत.  उद्या शिवसेना वर्धापन दिन आहे आणि परवा गद्दार दिन आहे, असा टोलाही ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. 

"भाजपला शिवसेनेचे महत्व कळलेलं नाही, उद्या तुमची सत्ता गेल्यानंतर तुमच्यासोबत कोणच नसणार नाहीत. आम्ही भाजप सत्तेत नसताना त्यांच्यासोबत होतो. आता देशात विरोधी पक्षांची एकजुट होणार आहे. देश प्रेमी लोकांची एकजुट होणार आहे, मी बिहारमध्ये जाणार आहे, मला नितीश कुमार यांनी निमंत्रण दिलं आहे, पूर्वी भाजप मातोश्रीमध्ये यायची पण आता विरोधी पक्ष मातोश्रीमध्ये येतात, भाजपला शिवसेनेचे महत्व कळलेलं नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना