रेल्वेच्या विकलांग डब्याला रॅम्प बसविणे शक्य आहे का?; उच्च न्यायालयाचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:33 AM2019-06-19T00:33:50+5:302019-06-19T00:33:58+5:30

उच्च न्यायालयाने याबाबत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले

Is it possible to put a ramp on a disabled passenger train ?; High Court question | रेल्वेच्या विकलांग डब्याला रॅम्प बसविणे शक्य आहे का?; उच्च न्यायालयाचा सवाल

रेल्वेच्या विकलांग डब्याला रॅम्प बसविणे शक्य आहे का?; उच्च न्यायालयाचा सवाल

Next

मुंबई : लोकलच्या विकलांगांच्या डब्यामध्ये चढ-उतार करण्यासाठी रॅम्प बसविणे शक्य आहे का, अशी विचारणा रेल्वे प्रशासनाकडे करत उच्च न्यायालयाने याबाबत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.

रेल्वे फलाट आणि लोकलमध्ये विकलांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी उच्च न्यायालयात ‘इंडिया सेंटर फॉर ह्युमन राइट्स’ या सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग यांनी विकलांगांच्या डब्यात चढ-उतार करण्यासाठी रॅम्प लावणे शक्य आहे का, अशी विचारणा रेल्वेच्या वकिलांकडे केली. त्यावर रेल्वेतर्फे नकार देण्यात आला. ‘प्रत्येक रेल्वे फलाटावर लोकल २० सेकंद थांबते. या वेळेत रॅम्प उघडून बंद करणार कसे, हा प्रश्न आहे,’ असे उत्तर रेल्वेच्या वकिलांनी न्यायालयाला दिले.

Web Title: Is it possible to put a ramp on a disabled passenger train ?; High Court question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.