Join us

सूडबुद्धीनं कारवाई करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायले मिळाले.

नवी मुंबई- स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 86व्या जयंती व माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायले मिळाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरीत्या शरद पवारांची पाठराखण केली आहे. सूडबुद्धीनं कारवाई करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला चिमटे काढले आहेत.येत्या निवडणुकीत युतीचंच सरकार येणार असल्याचंही उद्धव ठाकरे माथाडी कामगार मेळाव्यात म्हणाले आहेत. महायुतीचा सरकार राज्यात पुढच्या काळात असणार आहे. युतीबाबत जे काही गैरसमज व अफवा दूर झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार समिती सभापती विजय नाहटा यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. परंतु नवी मुंबईतलं वजनदार व्यक्तिमत्त्व असलेले गणेश नाईक या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. 

टॅग्स :उद्धव ठाकरे