Join us  

दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनावर खासदार शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 9:46 AM

मागील काही दिवसापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू आहे.

मागील काही दिवसापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू आहे. या आंदोनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी पवार यांनी केंद्र सरकारच्या समर्थनात अप्रत्यक्षपणे बाजू मांडली. 

'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा

खासदार शरद पवार म्हणाले, कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं अस काही नाही असं म्हणाले.  ब्रिजभूषण सिंह हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, त्यामुळे ते किती खोलात जातात हे पाहण महत्वाच आहे. कालपासून याची चौकशी सुरू झाली आहे. सरकार म्हणत आहे आधी आम्ही चौकशी करणार, सरकार चौकशी करत आहे. ही जमेची बाजू आहे, असंही शरद पवार म्हणाले. 

राज्यातील नेते बीआरमध्ये प्रवेश करत आहेत, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जे जात आहेत त्यांची फार चिंता करण्याची गरज नाही. वर्ष, सहा महिन्याचा अनुभव घेतल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं. केसीआर यांना सगळा देश मोकळा आहे. त्यामुळे ते कुठेही गेले तरी कुणालाही अडचण नाही, असंही पवार म्हणाले. 

शरद पवार म्हणाले, कोल्हापुरात काल घडलेल्या घटनेवर काल लगेच रस्त्यावर उतरुन त्याला धार्मिक स्वरुप देणं हे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांतील लोकच रस्त्यावर उतरले तर ते योग्य नाही, त्यातून दोन समाजामध्ये कटुता निर्माण होते हे चांगले लक्षण नाही. 

 ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी १५ जणांची चौकशी

कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीपोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. दिल्लीपोलिसांचे एक पथक सोमवारी रात्री लखनौ आणि गोंडा येथील ब्रिजभूषण सिंह यांच्या घरी पोहोचले. एसआयटीने ब्रिजभूषण सिंहे यांच्या घरी उपस्थित असलेल्या १२ जणांचे जबाब नोंदवले आहेत.

दिल्ली पोलिसांनी पुरावा म्हणून ब्रिजभूषण यांच्या घराची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची नावे, पत्ते आणि ओळखपत्रे गोळा केली आहेत.  या चौकशीनंतर पोलिसांचे पथक दिल्लीला परतले. पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस