पक्ष सोडून गेलेल्यांना घरी परतण्याची साद

By Admin | Updated: November 6, 2016 02:04 IST2016-11-06T02:04:41+5:302016-11-06T02:04:41+5:30

रोहा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ डॉ. सी.डी. देशमुख शहर सभागृहात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. या वेळी ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे

It is easy for those who have left parties to return home | पक्ष सोडून गेलेल्यांना घरी परतण्याची साद

पक्ष सोडून गेलेल्यांना घरी परतण्याची साद

रोहा : रोहा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ डॉ. सी.डी. देशमुख शहर सभागृहात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. या वेळी ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे...’ अशी साद तटकरेंनी स्वपक्षातील बंडखोरांना घातली.
या वेळी तटकरे म्हणाले की, तिकीटवाटपामध्ये काहींना डावलण्यात आले आहे, तर काहींना उमेदवारी नाकारण्यात आली; त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशा बंडखोरी करणाऱ्यांनी रोह्याच्या विकासासाठी पक्षात परत यावे, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.
शिवसेनेला अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविता आलेला नाही. त्यामुळे सेनेची सध्याची अवस्था कुणी उमेदवार देता का उमेदवार? अशी असल्याचे तटकरे म्हणाले.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, काँग्रेसचे मारुती देवरे, सुनील सानप, सुनील देशमुख, मितेश कल्याणी यांच्यासह सभापती लक्ष्मण महाले, विजय मोरे, तानाजी देशमुख, नंदकुमार म्हात्रे, विनोद पाशिलकर, प्रकाश कोठारी यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार तसेच अनिकेत व आदिती तटकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: It is easy for those who have left parties to return home