मराठीतला सैराट हिंदीत 'बिघडला'; ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 14:38 IST2018-06-11T14:38:34+5:302018-06-11T14:38:34+5:30

येत्या 20 जुलैला 'धडक' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Ishan khattar and Janhvi kapoor Dhadak trailer reactions on social media | मराठीतला सैराट हिंदीत 'बिघडला'; ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मराठीतला सैराट हिंदीत 'बिघडला'; ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मुंबई: मराठीत लोकप्रियतेचे नवे मापदंड रचणाऱ्या 'सैराट'चे हिंदी व्हर्जन असलेला 'धडक' चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. मात्र, हा ट्रेलर पाहून अनेकांची निराशा झाली आहे. हिंदी चित्रपट असल्यामुळे 'धडक'मधील लोकेशन्स आणि एकूणच वातावरणात बडेजाव आहे. मात्र, ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर या दोघांच्या नवखेपणामुळे ट्रेलरमधील प्रसंग तरी उठावदार न झाल्याची चर्चा आता रंगली आहे. यावरून आता सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. येत्या 20 जुलैला 'धडक' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शशांक खेतान याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून या चित्रपटाचे निर्मिती करण जोहर याने केली आहे.

'धडक'मध्ये हा अभिनेता साकारणार 'प्रिन्स दादा'ची भूमिका





































Web Title: Ishan khattar and Janhvi kapoor Dhadak trailer reactions on social media