लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बदलापूर, शीळफाटा, महापे, घणसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग - बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागविलेल्या स्वारस्य निविदांना खासगी भागीदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता ती रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामासाठी नव्याने निविदा काढाव्या लागणार आहेत.
एमएमआरडीएने मेट्रो १४ मार्गिकेची पीपीपी तत्त्वावर उभारणी करण्यासाठी कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या. या निविदा ३० मे रोजी काढल्या होत्या. त्याला खासगी गुंतवणूकदारांनी प्रतिसाद न दिल्याने तिला तीनदा मुदतवाढ द्यावी लागली होती. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी निविदा रद्दचा निर्णय एमएमआरडीएने घेतला.
असा असेल मार्ग
- मेट्रो १४ वर १५ स्थानके असतील.
- या मेट्रोची कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून, घणसोलीपर्यंत ती भूमिगत असेल.
- हा मार्ग ठाणे खाडीखालून जाणार आहे. खाडी परिसरात या मेट्रो मार्गिकेची लांबी जवळपास ५.७ किमी. असेल,
- घणसोली ते बदलापूर हा मार्ग उन्नत असेल.
- या मार्गिकेचा ४.३८ किमी लांबीचा मार्ग पारसिक हिल भागातून जाणार आहे.
Web Summary : Lack of private investor interest forces cancellation of Kanjurmarg-Badlapur Metro 14 tender. MMRDA to re-tender the project, crucial for Mumbai connectivity. The line includes underground and elevated sections, crossing Thane creek.
Web Summary : निजी निवेशकों की रुचि की कमी के कारण कांजूरमार्ग-बदलापुर मेट्रो 14 टेंडर रद्द। मुंबई कनेक्टिविटी के लिए महत्वपूर्ण परियोजना के लिए एमएमआरडीए फिर से टेंडर करेगा। लाइन में भूमिगत और ऊंचा खंड शामिल हैं, जो ठाणे क्रीक को पार करते हैं।