केजीएन असोसिएटच्या एजंटांची चौकशी करा; गुंतवणूकदारांची मागणी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:08 AM2020-03-13T01:08:57+5:302020-03-13T01:09:12+5:30

केजीएन असोसिएटससाठी एजंट म्हणून काम करणाºया बावीस एजंटांची नावे आणि अन्य तपशीलाची यादीच राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेने पोलिसांना सादर केली आहे.

Investigate KGN Associate's Agents; Investor Demand: | केजीएन असोसिएटच्या एजंटांची चौकशी करा; गुंतवणूकदारांची मागणी :

केजीएन असोसिएटच्या एजंटांची चौकशी करा; गुंतवणूकदारांची मागणी :

googlenewsNext

मुंबई : अल्पावधीत गुंतवणूकीची रक्कम दामदुपटीने परत करण्याचे आमिष दाखवत शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रूपये गोळा करणाऱ्या केजीएन असोसिएटसने नेमलेल्या २२ बड्या एजंटांची यादी पोलिसांना देऊनही त्यांच्याविरूद्ध कारवाई होत नसल्याची गुंतवणूकदारांची तक्रार आहे.

केजीएन असोसिएटसने गुंतवणूकदारांच्या फसवणूकीबाबत विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असले तरी अटक आरोपींकडून रक्कम परत मिळवण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. या प्रकरणातील अटकेत असलेला मुख्य आरोपी हरून रशीद अब्दुल सत्तार शेख सध्या ठाणे तुरूंगात बंदिस्त आहे. मात्र या प्रकरणात अनेक आरोपी सहभागी आहेत. या योजनेसाठी एजंट म्हणून काम करणाºया अनेकांनी गुंतवणूकदारांना या योजनेची माहिती देत त्यांना दामदुप्पट रकमेची भुरळ घातली. त्यामुळे भांडूप येथील मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर असलेल्या केजीएन असोसिएशनच्या वासुदेव चेंबरमधील कार्यालय गाठून गुंतवणूकदारांनी मोठमोठ्या रकमा गुंतवल्याचे गुंतवणूकदार सांगतात.

केजीएन असोसिएटससाठी एजंट म्हणून काम करणाºया बावीस एजंटांची नावे आणि अन्य तपशीलाची यादीच राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेने पोलिसांना सादर केली आहे. यातील अनेकजण गुंतवणूकदारांना फसवण्याच्या कटात सहभागी होते तर काहीजण भरघोस कमिशनच्या नादापायी या गुन्ह्यात सहभागी झाल्याचे परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी सांगितले. या एजंटांना पाठीशी घालण्याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या एजंटांपैकी केवळ मंगेश मोरे याच्याचविरोधात गुन्हा दाखल आहे.

गुंतवणूकदरांची यादी सादर
हा घोटाळा शेकडो कोटींचा असून या प्रकरणातील सर्व गुन्हे आर्थिक गुन्हेविरोधी विभागाकडे दाखल करण्याची मागणी परिषदेने केली आहे. दीड कोटी रूपये गुंतवणाºया गुंतवणूकदारांचीही यादी पोलिसांना सादर करण्यात आली आहे.

Web Title: Investigate KGN Associate's Agents; Investor Demand:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.