गुरूपौर्णिमा उत्साहात

By Admin | Updated: July 12, 2014 22:35 IST2014-07-12T22:35:01+5:302014-07-12T22:35:01+5:30

पनवेल परिसरात शनिवारी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Intrigued with Gurumuranima | गुरूपौर्णिमा उत्साहात

गुरूपौर्णिमा उत्साहात

पनवेल : पनवेल परिसरात  शनिवारी  गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने  ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी आपल्या गुरूंची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. 
गावदेवी पाडा येथील स्वामी समर्थ मंदिर मठात गुरूपौर्णिमा  उत्सव सोहळा पार पडला. यानिमित्ताने सकाळी काकड आरती, लघुरूद्र, सद्गुरूंचे पाद्यपूजन, दत्त गायत्री होमहवन आदी कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात  गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. शाळेतील विद्याथ्र्यानी शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद 
घेतले.
रेवदंडय़ातील विविध विद्यालयांत, परमार्थ निकेतन या बेळगांव निवासी कलावती आई यांच्या मंदिरात व अन्य ठिकाणी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा झाला. (वार्ताहर)

 

Web Title: Intrigued with Gurumuranima