मराठीसाठी एकात्मिक संवादात्मक पद्धत

By Admin | Updated: August 4, 2014 01:44 IST2014-08-04T01:44:00+5:302014-08-04T01:44:00+5:30

जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश यांसारख्या परकीय भाषा शिकण्यासाठी वापरण्यात येणारी एकात्मिक संवादात्मक पद्धती आता मराठी भाषा शिकवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

Integrated interactive method for Marathi | मराठीसाठी एकात्मिक संवादात्मक पद्धत

मराठीसाठी एकात्मिक संवादात्मक पद्धत

मुंबई : जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश यांसारख्या परकीय भाषा शिकण्यासाठी वापरण्यात येणारी एकात्मिक संवादात्मक पद्धती आता मराठी भाषा शिकवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या पुढाकाराने सुरू करण्यात येणाऱ्या अभिनव मराठी भाषा अध्यापन प्रकल्पामुळे हे शक्य होणार आहे.
या प्रकल्पामुळे परकीय भाषांप्रमाणे मराठीही प्रमाणित स्वरूपात शिकण्याची सोय उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाअंतर्गत एकूण सहा पातळ्यांचा अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पाठ्यपुस्तक, सरावपुस्तक आणि डी.व्ही.डी. यांचा समावेश असेल. या माध्यमातून अन्य भाषिकांना मराठी शिकवण्याच्या प्रक्रियेचे आधुनिकीकरण होणार आहे. जगभरात परकीय भाषा शिकवण्यासाठी जी एकात्मिक संवादात्मक पद्धती वापरली जाते, ती पद्धत या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक प्रा. विभा सुराणा यांनी दिली. एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ७०० ते ८०० तासांचे शिक्षण गरजेचे असते. सुमारे सहा पातळ्यांत हा अभ्यासक्रम असतो. मात्र खूप कमी भाषांच्या बाबतीत या प्रकारची सोय सार्वत्रिकरीत्या उपलब्ध आहे. त्यामुळे मराठी शिकण्याची सक्ती केल्यानंतर ती शिकायची कुठे, हा प्रश्न संबंधित प्रकल्पामुळे आता कायमचा मिटणार आहे. यानंतरच्या टप्प्यात असाच प्रयत्न हिंदी आणि इतर भारतीय भाषांसाठी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Integrated interactive method for Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.