ऑक्सिजन प्रकल्पाला अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:06 IST2021-05-10T04:06:45+5:302021-05-10T04:06:45+5:30

महावितरण; विद्युत यंत्रणेचा घेतला आढावा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या संकट काळात जेएसडब्ल्यू या अतिउच्चदाब वीज ग्राहकाच्या ऑक्सिजन ...

Instructions for uninterrupted power supply to Oxygen Project | ऑक्सिजन प्रकल्पाला अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश

ऑक्सिजन प्रकल्पाला अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश

महावितरण; विद्युत यंत्रणेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संकट काळात जेएसडब्ल्यू या अतिउच्चदाब वीज ग्राहकाच्या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना वीजभारात ४२ तासांत वाढ देऊन कोरोना लढ्यात मोलाची भूमिका बजाविण्यात आली. त्यामुळे महावितरण भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी डोलवी येथील ऑक्सिजन उत्पादक जेएसडब्ल्यू प्रकल्पाला भेट दिली. जे एसडब्ल्यूला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत यंत्रणेचा आढावा घेऊन प्रकल्पाला अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले.

कोरोना झालेल्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढली असून, त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जेएसडब्ल्यू या ऑक्सिजन उत्पादक कंपनीने प्रकल्प क्षमता वाढविण्यासाठी महावितरणकडून वाढीव वीजभार मंजूर होण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार, संबंधित ग्राहकांशी थेट संपर्क साधण्यात आला. वीजभारवाढीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कंपनीचे वाढीव वीजभार यशस्वीपणे कार्यान्वित केले.

.....................................

Web Title: Instructions for uninterrupted power supply to Oxygen Project