३१ पर्यंत ‘एचएसआरपी’ बसवा; नाहीतर दंड; मुंबईत १८ लाख ३७ हजार वाहनांवर नवीन प्लेट नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:43 IST2025-12-12T12:41:23+5:302025-12-12T12:43:15+5:30
नगर पंचायतींच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमुळे वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसवण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली. सध्या राज्यभरात सुमारे एक कोटीपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर ही प्लेट बसविणे शिल्लक आहे.

३१ पर्यंत ‘एचएसआरपी’ बसवा; नाहीतर दंड; मुंबईत १८ लाख ३७ हजार वाहनांवर नवीन प्लेट नाहीच
मुंबई : मुंबईत २०१९ पूर्वी नोंदणी झालेली एकूण २७ लाख २९ हजार ३९९ वाहने असून, त्यापैकी १८ लाख ३७ हजार वाहनांवर अद्याप ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) नाही. त्यामुळे आता ३१ डिसेंबर २०२५पूर्वी या वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसवून घेणे आवश्यक राहणार आहे.
नगर पंचायतींच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमुळे वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसवण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली. सध्या राज्यभरात सुमारे एक कोटीपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर ही प्लेट बसविणे शिल्लक आहे.
आता ही मुदतवाढ अंतिम असून, ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
२०१९ पूर्वीची सर्वाधिक वाहने बोरीवलीमध्ये
२०१९ पूर्वी नोंदणी झालेली सर्वाधिक वाहने बोरीवली आरटीओ कार्यालयामध्ये नोंदवली असून, सर्वांत कमी ‘एचएसआरपी’ याच कार्यालयाच्या कक्षेत असलेल्या वाहनधारकांकडून बसवण्यात आली आहेत. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
आरटीओच्या कार्यालयनिहाय ‘एचएसआरपी’वर दृष्टिक्षेप
मुंबई सेंट्रल ५,३९,४५२ १,८३,३३७ ३,५६,११५
वडाळा ६,३१,२४४ ३,८८,७२८ २,४२,५१६
अंधेरी ५,४८,१३० १,५४,६७५ ३,९३,४५५
बोरीवली १०,१०,५७३ १,६५,६७९ ८,४४,८९४
एकूण २,७२९,३९९ ८९२,४१९ १,८३६,९८०