लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अमानुष मारहाण झालेल्या वसईतील चार वर्षीय विघ्नेशबद्दल ‘लोकमत’ने ठाम भूमिका घेताच मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून विघ्नेशच्या वैद्यकीय उपचाराच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलली आहे.
सोसायटीच्या आवारात मित्रांसोबत खेळताना ४ वर्षीय विघ्नेश कोंढारेला आरोपी संदीप पवार याने अमानुष मारहाण केली. यात विघ्नेशच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वसई-विरारच्या पोलिस आयुक्तांकडून या घटनेचा आढावा घेतला होता.
आर्थिक साहाय्य तत्काळ मंजूर
विघ्नेशच्या उपचाराचा खर्च फरशी फिटिंगचा छोटा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविणारे विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे यांच्या आवाक्याबाहेर होता. त्यामुळे उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
फडणवीस यांच्या सूचनांनुसार तत्काळ आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या विघ्नेशवर मोफत उपचार सुरू असल्याची माहिती धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या मदतीबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विघ्नेशची प्रकृती आता स्थिर आहे.-अतुल कोंढारे, विघ्नेशचे वडील
Web Summary : Following Lokmat's report, CM Fadnavis provided aid from the CM Relief Fund for Vignesh Kondhare, a four-year-old assaulted in Vasai. The aid covers all medical expenses. Vignesh sustained severe head and hand injuries. Financial assistance was immediately approved, and he is receiving free treatment.
Web Summary : लोकमत की रिपोर्ट के बाद, मुख्यमंत्री फडणवीस ने वसई में चार वर्षीय विग्नेश कोंढारे पर हुए हमले के बाद मुख्यमंत्री राहत कोष से सहायता प्रदान की। सहायता में सभी चिकित्सा व्यय शामिल हैं। विग्नेश को सिर और हाथ में गंभीर चोटें आई हैं। तत्काल वित्तीय सहायता स्वीकृत की गई, और उसे मुफ्त इलाज मिल रहा है।