मुंबई : भांडुपमधील महापालिका प्रभाग क्रमांक ११४ च्या निवडणुकीवरून शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून भांडुपचे आमदार आणि ईशान्य मुंबई प्रमुख अशोक पाटील आणि विधानसभा प्रमुख संदीप जळगावकर यांनी जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
जळगावकर यांनी १५ लाख रुपये घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला असून, या मतदारसंघातील उमेदवार 'डमी' असून आपल्याला अन्य पक्ष अन्य प्रभागांमध्ये सहकार्य करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते, असा दावा जळगावकर यांनी केला आहे. या प्रभागातून शिंदेसेनेच्या सुप्रिया धुरत यांनी निवडणूक लढविली, तर त्यांना ठाकरे गटाचे खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजूल पाटील यांनी आव्हान दिले होते.
जाहीर आरोप झाल्याने जळगावकर संतप्त
मनसेच्या माजी नगरसेविका आणि महाराष्ट्र मनसे उपाध्यक्ष अनिशा माजगावकर यांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीला वेगळे वळण मिळाले होते. अखेरीस अटीतटीच्या लढतीमध्ये राजुल पाटील यांनी विजय मिळविला. मात्र निवडणूक संपल्यानंतरही वाद थांबलेला नाही.
आ. अशोक पाटील यांनी पक्ष पदाधिकान्यांसमोर जळगावकर यांच्यावर निवडणुकीमध्ये पैसे घेतल्याचा आरोप केल्याने जळगावकर यांनीही त्यांना ते सिद्ध करण्याचे आव्हान देत प्रत्युत्तर दिले.
प्रचारादरम्यान आमदारांची अनुपस्थिती, खर्च झालेला निधी आणि बैठका न होण्याबाबतही सवाल उपस्थित केले आहेत. हा संघर्ष जाहीरपणे सुरू असून पाटील यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बदनामी न थांबविल्यास माझ्याकडेही अनेक पुरावे असल्याचा इशारा जळगावकर यांनी पाटील यांना दिला आहे.
Web Summary : Internal disputes within Shinde Sena surfaced over Bhandup election. MLA Ashok Patil accused Sandeep Jalgaonkar of corruption. Jalgaonkar retaliated, questioning Patil's campaign absence and fund usage. Tensions escalate post-election victory of Rajul Patil.
Web Summary : भांडुप चुनाव को लेकर शिंदे सेना में आंतरिक विवाद सामने आया। विधायक अशोक पाटिल ने संदीप जलगांवकर पर भ्रष्टाचार का आरोप लगाया। जलगांवकर ने पाटिल की प्रचार में अनुपस्थिति और धन के उपयोग पर सवाल उठाए। चुनाव जीतने के बाद भी तनाव जारी।