Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगमंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:46 IST

काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दावोसचा दौरा केला होता. 

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री यांना तात्काळ मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांना उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उदय सामंत यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दावोसचा दौरा केला होता. 

टॅग्स :उदय सामंतहॉस्पिटल