Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘केईएम’मध्ये चक्कर, संतुलन विकारांसाठी स्वदेशी ‘बॅलन्स चेअर’, अचूक निदान, प्रभावी उपचारासाठी प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:35 IST

Health News: व्हर्टिगो व संतुलन विकारांच्या उपचारात महत्त्वाचा टप्पा गाठत केईएम रुग्णालयात स्वदेशी विकसित ऑटोमेटेड बॅलन्स चेअर फॉर डिझिनेस या अत्याधुनिक उपकरणाचे सादरीकरण करण्यात आले. अचूक निदान व प्रभावी उपचारासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबई -  व्हर्टिगो व संतुलन विकारांच्या उपचारात महत्त्वाचा टप्पा गाठत केईएम रुग्णालयात स्वदेशी विकसित ऑटोमेटेड बॅलन्स चेअर फॉर डिझिनेस या अत्याधुनिक उपकरणाचे सादरीकरण करण्यात आले. अचूक निदान व प्रभावी उपचारासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ही चेअर ईएनटी सर्जन डॉ. विनोद खंदार यांनी त्यांच्या अभियंता भावासोबत विकसित केली असून, वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा संगम असलेले हे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे. इएनटी तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट यांना चक्कर व संतुलन विकार असलेल्या रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी ही चेअर विशेष साहाय्यभूत ठरणार आहे. चेअर संगणक-नियंत्रित असून बहुअक्षीय रचनेमुळे ती ३६० अंशांपर्यंत फिरवता येते. यामुळे कानातील सेमिकर्क्युलर कॅनालच्या सर्व प्लेन्समध्ये अचूक हालचाल करता येते. तसेच व्हिडीओ नायस्टॅग्मोग्राफी (व्हीएनजी)च्या मदतीने रुग्णाची रिअल-टाइम तपासणी करता येते. सुरक्षित हार्नेसिंग प्रणालीमुळे रुग्णांची सुरक्षिततादेखील सुनिश्चित केली जाते.

सर्वसामान्यांना परवडणारअशा प्रकारच्या आयात केलेल्या उपकरणांची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये असताना, ही स्वदेशी विकसित प्रणाली त्याच कार्यक्षमतेसह जवळपास एक-चतुर्थांश खर्चात उपलब्ध होत आहे.  त्यामुळे प्रगत चक्कर उपचार अधिक परवडणारे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. 

उपचार यशाचा दर ९७ टक्केस्वयंचलित चेअर्सद्वारे उपचार यशाचा दर सुमारे ९६ ते ९७ टक्क्यांपर्यंत असून, गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही चांगले परिणाम मिळतात. तसेच, उपचार सत्रांची संख्या सरासरी १.४ इतकी कमी असल्याने ही पद्धत पारंपरिक मॅन्युअल उपचारांपेक्षा अधिक परिणामकारक ठरते.

किफायतशीर नवकल्पना हा उपक्रम ‘मेक इन इंडिया’च्या भावनेला साजेसा आहे. या शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वदेशी वैद्यकीय नवकल्पनांचा रुग्णसेवा, तज्ज्ञांची कार्यपद्धती आणि भारतातील किफायतशीर आरोग्य तंत्रज्ञानाच्या भविष्यात कसा मोठा वाटा असू शकतो, याची झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : KEM Unveils Indigenous Balance Chair for Dizziness, Equilibrium Disorders

Web Summary : KEM Hospital introduces an automated balance chair, developed indigenously for accurate diagnosis and effective treatment of vertigo and equilibrium disorders. This cost-effective innovation, created by an ENT surgeon and engineer, offers a 97% treatment success rate and is a fraction of the cost of imported alternatives.
टॅग्स :मुंबईआरोग्य