Join us  

चाईल्ड पॉर्न पाहणाऱ्या भारतीय पायलटला अमेरिकेत अटक; भारतात पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 11:52 AM

नवी दिल्लीहून हे विमान अमेरिकेला पोहोचले होते. यावेळी मुंबईत राहणाऱ्या या 50 वर्षीय पायलटला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांसमोरच ताब्यात घेतले.

वॉशिंग्टन : लहान मुलांचे अश्लिल व्हिडिओ पाहणाऱ्या भारतीय विमान कंपनीच्या पायलटला अमेरिकेमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याचा व्हिसाही रद्द करण्यात आला असून सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर विमानातून उतरविण्यात आले आहे. 

नवी दिल्लीहून हे विमान अमेरिकेला पोहोचले होते. यावेळी मुंबईत राहणाऱ्या या 50 वर्षीय पायलटला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांसमोरच ताब्यात घेतले. हा पायलट वरिष्ठ अधिकारी म्हणून विमान वाहतूक कंपनीमध्ये काम करतो. तसेच नेहमी अमेरिकेला जाणारी विमाने चालवितो. 

अमेरिकेतील नियमांनुसार अमेरिकेतून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सर्व प्रवाशी तसेच कर्मचाऱ्यांची माहिती उड्डाणाच्या 15 मिनिटे आधी यूएस ब्युरो ऑफ कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शनला देणे बंधनकारक असते. एफबीआय या पायलटची अमेरिकेत येण्याची वाट पाहत होते. 

हा पायलट अमेरिकेतील हॉटेलमध्ये राहत असताना इंटरनेटवरून चाईल्ड पॉर्न डाऊनलोड करत असे. यामुळे तो एफबीआयच्या रडारवर आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून एफबीआय त्याच्यावर लक्ष ठेवून होती. शुक्रवारी हा पायलट दिल्लीहून विमान घेऊन आला असता एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी करून पासपोर्ट रद्द केला व परत दिल्लीच्या विमानाने भारतात पाठवून दिले, असे सुत्रांनी सांगितले. एफबीआयने एका डोझियरमध्ये भारताच्या अधिकाऱ्यांकडे पुरावे सोपवले आहेत. 

विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की व्हिसा प्रकरणी त्याला भारतात पाठविण्यात आले. मात्र, कंपनीतील अन्य तीन कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चाईल्ड पॉर्नमुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. 

टॅग्स :वैमानिकअमेरिकालैंगिक शोषणभारत