Join us  

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार जैसे थे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 3:54 PM

5 हजार 020 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री  देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे" हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे"

मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.15 जून, 2020 रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री  सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण 5 हजार 020 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री  देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, चीनच्या सैन्यांने विश्वासघात करत लडाखमधील गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. याचदिवशी महाराष्ट्र सरकारने चीनची सर्वात मोठी वाहन कंपनी ग्रेट वॉल मोटर्ससोबत 1 अब्ज डॉलरचा करार केला होता. यासह आणखी दोन करार चीनला धडा शिकविण्यासाठी सरकारने थंड बस्त्यात टाकले आहेत.

गलवान हल्ल्यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. सीमेवर तणाव वाढतच चालला आहे. चीनच्या बाजुने लढाऊ विमाने, रणगाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. यामुळे भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू केली आहे. india boycott china च्या मोहिमेमुळे महाराष्ट्र सरकारनेही चीनला चांगलाच दणका दिला आहे. 

आणखी बातम्या...

ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

धक्कादायक! पतीकडून पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, परिसरात खळबळ

Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!

राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'

टॅग्स :सुभाष देसाईचीनमहाराष्ट्र