Join us

आवक वाढली, भाजी झाली स्वस्त; गाजर, मटारचे दर आले निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 10:48 IST

२० रुपये किलो गाजर; भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवरचे दरही कमी.

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव घसरण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी २९८ टन गाजर विक्रीसाठी आले आहे. एक आठवड्यात गाजरचे दर प्रतिकिलो ३४ ते ४२ वरून १६ ते २० रुपयांवर आले आहेत. मटारसह इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. बाजार समितीमध्ये ६७७ वाहनांची आवक झाली असून त्यामध्ये २९०८ टन भाजीपाल्याचा समावेश आहे. 

५ लाख ७८ हजार जुडी पालेभाज्याही विक्रीसाठी आल्या आहेत. सर्वच वस्तूंची आवक वाढल्यामुळे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भोगीला भाजीसाठी गाजर, वाटाणा, घेवडा यांची मागणी वाढत असते. या वर्षी गाजरची आवक प्रचंड वाढू लागली आहे. शुक्रवारी तब्बल २९८ टन आवक झाली आहे. बाजारभावही निम्यावर आले आहेत.

टॅग्स :मुंबईभाज्या