Join us  

पश्चिम उपनगरात वाढतो कोरोनाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 6:07 PM

Corona News : अंधेरी ते बोरिवली याभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई: पश्चिम उपनगरातील प्रामुख्याने अंधेरी ते बोरिवली याभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.यामध्ये प्रामुख्याने आर मध्य( बोरिवली)आर दक्षिण (कांदिवली),पी उत्तर (मालाड), के पूर्व (अंधेरी पूर्व) व के पश्चिम (अंधेरी पश्चिम) या पाच वॉर्ड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त,कार्यकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अविरत मेहनत करत आहेत. मात्र गेल्या दि,8 ऑगस्टला लॉकडाऊन शिथील केल्यानंतर या पाच वॉर्ड मध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.आता दि,5 पासून हॉटेल्स आणि बिअर बार सुरू करण्यास कालच राज्य शासनाने परवानगी दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 मुंबईच्या पालिकेच्या 24 वॉर्ड पैकी आतापर्यंत सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे आर मध्य वॉर्ड मध्ये आहेत. दि,29 सप्टेंबर पर्यंत या वॉर्डमध्ये आतापर्यंत 13007 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दि,22 ते दि,29 या सात दिवसात या वॉर्डमध्ये 1253 रुग्ण वाढले आहेत.आतापर्यंत 10318 रुग्ण कोरोनामुक्त झाले,360 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दि,29 पर्यंत 2329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याठिकाणी रुग्ण वाढीचा दुपटीचा दर हा 47 दिवस आहे.

आर मध्य वॉर्ड मध्ये प्रामुख्याने इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत.यामध्ये कामावर जात असलेल्या विविध अस्थापनातील बाधीत होणारे आपत्कालीन  कर्मचारी,रस्त्यावर विनामास्क फिरणारे नागरिक,30 टक्के वाढलेले अनाधिकृत फेरीवाले यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

आर दक्षिण वॉर्ड मध्ये दि,29 सप्टेंबर पर्यंत 10713 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दि,22 ते दि,29 या सात दिवसात  या वॉर्डमध्ये 897 रुग्ण वाढले आहेत.आतापर्यंत 8646 रुग्ण कोरोनामुक्त झाले,297 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दि,29 पर्यंत 1770 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी रुग्ण वाढीचा दुपटीचा दर  53 दिवस आहे.

पी उत्तर वॉर्ड मध्ये दि,29 सप्टेंबर पर्यंत 11990 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दि,22 ते दि,29 या सात दिवसात  या वॉर्डमध्ये 837 रुग्ण वाढले आहेत.आतापर्यंत 10043 रुग्ण कोरोनामुक्त झाले,413 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दि,29 पर्यंत 1514 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 67 दिवस आहे.

के पूर्व वॉर्ड मध्ये दि,29 सप्टेंबर पर्यंत 11863 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दि,22 ते दि,29 या सात दिवसात  या वॉर्डमध्ये 719 रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत 9665 रुग्ण कोरोनामुक्त झाले,594 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दि,29 पर्यंत 1607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 68 दिवस आहे.विशेष म्हणजे मुंबईतील आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू या वॉर्ड मध्ये झाले आहेत.

के पश्चिम वॉर्ड मध्ये दि,29 सप्टेंबर पर्यंत 12274 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दि,22 ते दि,29 या सात दिवसात  या वॉर्डमध्ये 1063 रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत 10001 रुग्ण कोरोनामुक्त झाले,381 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दि,29 पर्यंत 1892 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 54 दिवस आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईलॉकडाऊन अनलॉक