मविआच्या बैठकीत मुंबईतील जागांवर खलबते; ठाकरेंच्या शिवसेनेनं केला 'इतक्या' जागांवर दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 08:40 IST2024-08-25T08:39:56+5:302024-08-25T08:40:23+5:30
मुंबईतील विधानसभा जागांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.

मविआच्या बैठकीत मुंबईतील जागांवर खलबते; ठाकरेंच्या शिवसेनेनं केला 'इतक्या' जागांवर दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभेसाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली असून मुंबईतील जागा वाटपासंदर्भात आघाडीच्या नेत्यांची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत उद्धवसेनेने २० ते २२ जागांवर दावा केला आहे.
या बैठकीला उद्धवसेनेकडून खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, अस्लम शेख, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. मुंबईतील विधानसभा जागांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.
दरम्यान, उद्धवसेनेने गेल्यावेळी जिंकलेल्या १४ जागांसह अधिकच्या सात ते आठ जागांवर दावा केला आहे. काँग्रेसने १३ ते १५ जागांसाठी आग्रह धरला आहे.