Join us  

युतीतही भाजप वरचढ, मुंबईतील मतांच्या टक्केवारीतून झाले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:09 AM

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विधानसभानिहाय मतदान.

मुंबई : भाजपसोबत युतीमध्ये लढताना मुंबईत शिवसेनेचा (तेव्हाची एकसंध शिवसेना) वरचष्मा राहिला असला तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान पाहता, जिथे जिथे भाजपने निवडणूक लढवली, तिथे तिथे सेनेला इतर मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या तुलनेत भाजपला भरभरून मतदान झालेले दिसते.

उदाहरणार्थ, मुंबईतील ३६ पैकी सात विधानसभा मतदारसंघांत भाजपला ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. तुलनेत शिवसेनेकडे बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी झळकूनही काही मतदारसंघांत ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले नव्हते. सात मतदारसंघ ठरावीक समाजाचा वरचष्मा असलेले आहेत. त्यावेळी मुंबईतील उत्तर मुंबई, उत्तर मध्य, उत्तर पूर्व या जागा भाजपने, तर उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या तीन जागा शिवसेनेने लढवल्या होत्या. त्यांना उत्तर पूर्वेची राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेली जागा वगळता उर्वरित पाचही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांशी दोन हात करावे लागले होते.  सेनेला सर्वांत कमी मते चेंबूरमध्ये मिळाली होती. चेंबूरमध्ये अवघ्या २५.४ टक्के मतदारांनी सेनेच्या पारड्यात मते टाकली होती.

३६ विधानसभा मतदारसंघांतील टक्केवारी-

शिवसेना (०) ६० ते ६९ टक्क्यांदरम्यान झालेले मतदान.

१) शिवसेना - दिंडोशी, गोरेगाव, अंधेरी (पू), जोगेश्वरी, वडाळा, माहिम, मलबार हिल विधानसभा मतदारसंघ.

२) भाजप- घाटकोपर (पू) मतदारसंघ.

३) काँग्रेस - मुंबादेवी मतदारसंघ. 

३० ते ३९ टक्क्यांदरम्यान झालेले मतदान-

काँग्रेस (११) - अंधेरी (प), अंधेरी (पू), चांदिवली, घाटकोपर (प), विक्रोळी, भांडुप (प), अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा, वरळी, कुलाबा, शिवडी.

७० टक्के आणि त्याहून अधिक मतदान-

१) भाजप - दहिसर, कांदिवली (पू), मागाठाणे, बोरीवली, चारकोप, मुलुंड, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ.

५० ते ५९ टक्क्यांदरम्यान मतदान-

१) भाजप - मालाड, वांद्रे (प), चांदिवली, कलिना, भांडुप (प), विक्रोळी, घाटकोपर (प) विधानसभा मतदारसंघ.

२) शिवसेना - वर्सोवा, अंधेरी (प), चेंबूर, सायन-कोळीवाडा, वरळी, कुलाबा, शिवडी विधानसभा मतदारसंघ.

३) काँग्रेस - मानखुर्द शिवाजीनगर, भायखळा विधानसभा मतदारसंघ.

४० ते ४९ टक्क्यांदरम्यान मतदान-

१) भाजप - वांद्रे (पू) व कुर्ला विधानसभा मतदारसंघ.

२) शिवसेना - अणुशक्ती नगर व धारावी विधानसभा मतदारसंघ.

३) काँग्रेस - मालाड, वर्सोवा, वांद्रे (प), वांद्रे (पू), कुर्ला, कलिना, धारावी विधानसभा मतदारसंघ.

२० ते २९ टक्क्यांदरम्यान मतदान-

१) भाजप - मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ.

२) काँग्रेस - दहिसर, कांदिवली (पू), चारकोप, मागाठाणे, दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपर (पू), चेंबूर, वडाळा, माहीम, मलबार हिल विधानसभा मतदारसंघ.

बोरीवलीत अवघे १७.६ टक्के-

काँग्रेसला उत्तर मुंबईचा भाग असलेल्या बोरीवलीत अवघे १७.६ टक्के मतदान झाले होते. मुंबईभरात काँग्रेसला झालेले हे सर्वाधिक कमी मतदान होय.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४भाजपा