रिक्षा अन्  टॅक्सीचालकांनी भाडे नाकारले, परवाने निलंबित झाले, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 10:24 AM2024-03-06T10:24:01+5:302024-03-06T10:25:49+5:30

चुकीची तक्रार करणाऱ्या प्रवाशांनाही समज.

in mumbai rickshaw and taxi drivers refuse fare their license suspended | रिक्षा अन्  टॅक्सीचालकांनी भाडे नाकारले, परवाने निलंबित झाले, प्रकरण काय?

रिक्षा अन्  टॅक्सीचालकांनी भाडे नाकारले, परवाने निलंबित झाले, प्रकरण काय?

मुंबई : भाडे नाकारणे, अतिरिक्त भाडे घेणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे अशा अनेक तक्रारी पूर्व मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन रिक्षा आणि टॅक्सी वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यापासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर, चुकीची तक्रार करणाऱ्या तक्रारदारांनाही समज दिली जात असून, खोटी तक्रार करणे अपराध असल्याची सूचना प्रवाशांना करण्यात आली आहे.

एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांना चालकांकडून त्रास दिला जात असेल तर तेथे विशेष पथकाची नेमणूक केली जाते. चालकांचे समुपदेशन केले जाते. प्रवाशांना तक्रार कक्षाबद्दल याची माहिती दिली जाते. दोषी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते, अशी माहिती पूर्व मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली. ५५७ परवानाधारकांचे परवाने ठोस कारणाशिवाय भाडे नाकारण्यासाठी १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असून, ६६ वाहनधारकांकडून एक लाख ६३ हजार ५०० तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

येथे नोंदवा तक्रार :

१) प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ९१५२२४०३०३ हा व्हॉट्सॲप क्रमांक देण्यात आला आहे.

२) १२८ परवानाधारकांचे परवाने प्रवाशांशी गैरवर्तन केले म्हणून १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असून, १३ वाहनधारकांकडून १९ हजार ५०० तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. 

३) एकूण ९६ तक्रारींप्रकरणी दोन लाख ३७ हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. उर्वरित प्रकरणांबाबत कारवाई सुरू आहे.

भाडे नाकारण्याचे सर्वाधिक प्रकार :

११ जुलै २०२३ ते २९ फेब्रुवारीपर्यंत एक हजार ८६५ तक्रारी प्राप्त झाल्या. ७९० तक्रारी पूर्व उपनगरातील कार्यालयाशी संबंधित आहेत. त्यापैकी ६७२ तक्रारी रिक्षा व ११८ तक्रारी टॅक्सीशी संबंधित आहेत. ७९० तक्रारींपैकी ५८८ तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, ५९ तक्रारी जादा भाडे घेणे, १४३ तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तनाशी निगडित आहेत. ३७ तक्रारींप्रकरणी तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंदविल्याने त्यांना समज देण्यात आली आहे.

Web Title: in mumbai rickshaw and taxi drivers refuse fare their license suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.