Join us

बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 09:49 IST

नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील सर्व मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत. या काळात स्वादिष्ट मिठाईला मागणी असते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील सर्व मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत. या काळात स्वादिष्ट मिठाईला मागणी असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात बंगाली मिठाईचे नवनवीन प्रकार आणण्याची तयारी व्यावसायिकांनी केली आहे.

दरवर्षी नवरात्रीच्या काळात देवीसमोर मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी नऊ दिवस दरदिवशी विविध प्रकारची मिठाई दाखवली जाते. दर्शनासाठी येणारे आप्तस्वकीय आणि मित्र परिवाराचे तोंड गोड करण्यासाठी अनेक जण मिठाई घेऊन जातात. यंदाही मिठाईची मागणी अधिक राहण्याची आशा व्यावसायिकांना आहे. पुढील आठवडाभर ही मागणी चांगली राहते. त्यानुसार आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती दादर येथील व्यापारी रमेश छेडा यांनी दिली. 

बाजारात यंदाही मलाई सँडविच, मलाई चम चम, केशर वाटी, मलाई चणा टोस्ट, खीर कोडम, राजभोज केशर मलाई, विविध प्रकारचे रसगुल्ले, केशर रसमलाई आदी बंगाली मिठाईला मागणी राहण्याची अपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. या स्वादिष्ट मिठाईसोबत मिठाईचे आणखीही नवनवीन प्रकार बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. 

बंगाली मिठाईची किंमत किती?

१)  मलाई सँडविच - ५५ (प्रति नग)

२)  मलाई चम चम - ६० (प्रति नग)

३) केशर वाटी - ६० रु. (प्रति नग)

४)  मलाई चणा टोस्ट - ५० (प्रति नग)

५) चम चम - ३८ (प्रति नग)

६)  खीर कोडम विथ क्रिम - ४५ (प्रति नग)

७) काला जामून - ३६० (प्रति किलो)

८) मिनी रसगुल्ले - ६०० (प्रति किलाे)

९) केशर रसमलाई - २७५ (५ नग)

टॅग्स :मुंबईनवरात्रीबाजार