दागिन्यांसाठी सोने आयात केले, पण खुल्या बाजारात सोने विकले, दोन ज्वेलरना डीआरआयने केली अटक
By मनोज गडनीस | Updated: May 16, 2024 18:03 IST2024-05-16T18:03:09+5:302024-05-16T18:03:49+5:30
Mumbai Crime News: दागिन्यांची निर्मिती आणि निर्याती संदर्भात असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत परदेशातून ३७ किलो सोने मुंबईत आणत ते इथे नियमबाह्य पद्धतीने खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी दोन ज्वेलरना अटक केली आहे.

दागिन्यांसाठी सोने आयात केले, पण खुल्या बाजारात सोने विकले, दोन ज्वेलरना डीआरआयने केली अटक
- मनोज गडनीस
मुंबई - दागिन्यांची निर्मिती आणि निर्याती संदर्भात असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत परदेशातून ३७ किलो सोने मुंबईत आणत ते इथे नियमबाह्य पद्धतीने खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी दोन ज्वेलरना अटक केली आहे. हे दोघेही मुंबईत कार्यरत आहेत.प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण २०१५ -१६ या आर्थिक वर्षातील आहे. सोन्याच्या दागिन्यांची निर्मिती आणि निर्यात या संदर्भात केंद्र सरकारचे एक धोरण आहे. या धोरणाअंतर्गत सोने व्यापाऱ्यांना सोन्याची आयात करता येते. या सोन्याचे दागिने घडविल्यानंतर संबंधित धोरणानुसार त्याची माहिती सीमा शुल्क विभागाला द्यावी लागते. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी १८ कोटी रुपये मूल्याचे ३७ किलो सोने परदेशातून आयात केले आणि त्याचे दागिने करण्याऐवजी ते देशात खुल्या बाजारात विकले. या नियमभंगामुळे ३ कोटी ३८ लाख रुपयांच्या सीमा शुल्काचे नुकसान झाल्याचा ठपका डीआरआयने त्यांच्यावर ठेवत त्यांना अटक केली आहे.