मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 15, 2025 17:53 IST2025-05-15T17:52:22+5:302025-05-15T17:53:19+5:30

Mumbai Parking News: केवळ उत्पादकतेवरच परिणाम होत नाही तर व्यक्तींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही हानिकारक परिणाम होतात. याकडे देखिल पिमेंटा यांनी लक्ष वेधले आहे.

Implement odd-even scheme as a solution to traffic congestion in Mumbai: Watchdog Foundation | मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन

- मनोहर कुंभेजकर, मुंबई
मुंबई शहराच्या जलद विस्तारामुळे, खाजगी वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांची मर्यादित जागा यामुळे दररोज प्रवास करणे कठीण झाले आहे आणि वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक मर्यादेपर्यंत पोहोचली आहे. ज्यामुळे जनतेला गंभीर आरोग्य धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईत वाहनांसाठी सम-विषम किंवा रंग कोडिंग योजना लागू करण्याची आग्रही मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबईतील वाहनांची संख्या जवळजवळ ५० लाखांपर्यंत वाढली आहे, ज्यामध्ये दररोज सरासरी १९३ नवीन कार आणि ४६० दुचाकींची भर पडत आहे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये त्या अनुरूप विस्तार न होता ही जलद वाढ होत आहे, ज्यामुळे काही भागात प्रति किलोमीटर अंदाजे ८०० वाहनांची घनता वाढत आहे. 

वाचा >>...आणि निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वतंत्र लढण्याचे संकेत

अशा गर्दीमुळे केवळ वाहतुकीचा सुरळीत प्रवाहच बाधित होत नाही तर शहरातील प्रदूषण पातळी देखील वाढते आणि हवेची गुणवत्ताही खालावण्यास हातभार लागतो. मुंबईकरांसाठी दररोजचा प्रवास हा प्रचंड ताणतणावाचा स्रोत बनला आहे. सरासरी, प्रवासी दररोज ८५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहतात, आणि गर्दीच्या वेळेत आणखी जास्त विलंब होतो. 

वाहतूक कोंडीत दीर्घकाळ राहिल्याने केवळ उत्पादकतेवरच परिणाम होत नाही तर व्यक्तींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही हानिकारक परिणाम होतात. याकडे देखिल पिमेंटा यांनी लक्ष वेधले आहे.

२८ एप्रिल रोजी गोरेगाव पूर्व ओबेरॉय मॉल ते वांद्रे पूर्व कलानगर अंतर सकाळी १० ते दुपारी १२.३० दरम्यान तब्बल अडीच तास लागले होते अशी माहिती त्यांनी दिली. 

वाहन प्रवेश क्षेत्र किंवा टाइम विंडोजसाठी रंग कोडिंग योजना वेळेच्या स्लॉट किंवा शहर झोनमध्ये वाहनांच्या हालचालींचे नियमन करण्यासाठी इंधन प्रकार, वापर (व्यावसायिक/खाजगी) किंवा उत्सर्जन पातळीनुसार वाहनांना रंग देण्याची एक नाविन्यपूर्ण प्रणाली वापरली जाऊ शकते. 

यामुळे स्वच्छ वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढू शकतो, नोंदींचे वेळापत्रक तयार करून वाहतूक व्यवस्थापन चांगले होऊ शकते आणि कमी उत्सर्जन क्षेत्रच्या अंमलबजावणीला समर्थन मिळू शकते अशी भूमिका त्यांनी आपल्या निवदेनात मांडली आहे.

Web Title: Implement odd-even scheme as a solution to traffic congestion in Mumbai: Watchdog Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.