मनुष्यबळ विकासासाठी प्रभावी योजना राबवा; मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:26 AM2024-01-19T10:26:33+5:302024-01-19T10:28:26+5:30

मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते कौशल्य रोजगार राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन.

Implement effective plans for manpower development appeal by minister mangal prabhat lodha | मनुष्यबळ विकासासाठी प्रभावी योजना राबवा; मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन 

मनुष्यबळ विकासासाठी प्रभावी योजना राबवा; मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन 

मुंबई : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात  येणाऱ्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवा, कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय येथे गुरूवारपासून कौशल्य विकास विभागामार्फत सर्व उपायुक्त,  सहायक आयुक्त व जिल्हा कौशल्य विकास समन्वयक अशा सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. 

या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला  महाराष्ट्र राज्य   कौशल्य विकास रोजगार आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  निधी चौधरी, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर उपस्थित होते.

रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करा :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून गावागावात रोजगार निर्मिती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. या कार्यशाळेत   विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमवेतच ट्रेनिंग पार्टनर व ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख यांनीदेखील या कामासाठी सहकार्य करावे, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, महाराष्ट्र इंटरनॅशनल, नावीन्यता, सारथी या योजना प्रभावीपणे राबवा, याबाबतीत कोणाच्या सूचना, अडचणी असल्यास जरूर सांगाव्यात त्यावर मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री लोढा म्हणाले.

Web Title: Implement effective plans for manpower development appeal by minister mangal prabhat lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.