वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 12:39 IST2020-12-25T12:38:59+5:302020-12-25T12:39:15+5:30

Immediate transfer of municipal officers : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांची पालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी 

Immediate transfer of municipal officers who have been in the same place for years | वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा 

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा 


 मुंबई  :  वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या  पालिका अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री  अस्लम शेख यांनी  मुंबई महानगरपालिका आयुक्तांंकडे पत्राद्वारे केली आहे. 
 
अस्लम शेख यांनी पत्रात म्हटले आहे की, ठरावीक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना बदलीपात्र असूनही महानगरपालिकेतील पदाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचं चित्र मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत सर्रास पहायला मिळते

 पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलय की, कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी  कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करीत असल्याने अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने व काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते.

 त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची बदली करावी. ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करावे, असेही त्यांनी या पत्रात मागणी केली आहे.
 

Web Title: Immediate transfer of municipal officers who have been in the same place for years