Join us

आयआयटी प्लेसमेंट; विद्यार्थ्यांना मिळाल्या चांगल्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 00:58 IST

मुंबई : आपल्या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या दुसऱ्या दिवशीही २१ कंपन्यांनी १०० हून अधिक ...

मुंबई : आपल्या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या दुसऱ्या दिवशीही २१ कंपन्यांनी १०० हून अधिक जॉब आॅफर्स विद्यार्थ्यांना देऊ केल्या आहेत. त्यामुळे दुसºया दिवशीही आयआयटीचे विद्यार्थी आपला दबदबा प्रत्येक क्षेत्रातील कंपनीत कायम राखण्यात यश मिळवू शकले आहेत.आंतरराष्ट्रीय आॅफर्स देणाºया कंपन्यांमध्ये जपानची सीसमेक्स कॉर्पोरेशन, नेदरलँड्सची फ्लो ट्रेडर्स, जपानची मुराटा या कंपन्या आघाडीवर असल्याचे आयआयटीकडून सांगण्यात आले. पुढील काही दिवसांत इंजिनीअरिंग, आयटी, सॉफ्टवेअर, फायनान्स अँड कन्सलटिंग आदी क्षेत्रांतील कंपन्या पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची आयआयटीला आशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही चांगल्या आॅफर प्राप्त होतील, असे चित्र पाहायला मिळत आहे.यंदा मंदीमुळे आयआयटीच्या प्लेसमेंट कमी होतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. असे असले तरी यंदा अपेक्षापेक्षा चांगली नोंदणी झाल्याचे संस्थेने या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले. मागील वर्षी पहिल्या दिवशी २१ कंपन्यांनी नोंदणी केली होती. यंदा ही संख्या १८ इतकी झाली आहे. पहिल्या दिवसाचा दुसरा टप्पा रविवारी रात्री २ वाजेपर्यंत सुरू होता. दुसºया टप्प्यात होंडा (आर अँड डी) कडून वार्षिक ८२ जणांना पॅकेजची आॅफर देण्यात आली. त्यानंतर जपानच्या सोनी कंपनीकडून वार्षिक ७८.६३ लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. जपानच्या एनईसीकडून वार्षिक ४३.२८ लाखांचे, तर टीएसएमसीकडून वार्षिक १७. ९६ लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे.

टॅग्स :आयआयटी मुंबई