मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव 

By गौरी टेंबकर | Published: June 24, 2024 02:21 PM2024-06-24T14:21:33+5:302024-06-24T14:21:46+5:30

तुझ्याहून चांगल्या मुली मला भेटतील असेही सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

If you put on makeup you look like those women Wife runs to police against husband  | मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव 

मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव 

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मेकअप केल्यावर बारमधील बाईची उपमा देत तसेच काम कर असे बोलून पत्नीचे खच्चीकरण करणाऱ्या २५ वर्षीय पती तसेच त्याला साथ देणाऱ्या सासरच्या मंडळीविरोधात एम एच बी कॉलनी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २२ वर्षीय पत्नीने पोलिसात धाव घेत तक्रार केली होती.

तक्रारदार महिला सुनिता (नावात बदल ) या दहिसर पश्चिमच्या कांदरपाडा परिसरात राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचे वसंत (नावात बदल ) या पुण्यात राहणाऱ्या बीजवरासोबत गेल्यावर्षी मे महिन्यात लग्न झाले होते. लग्नात सुनीताच्या घरच्यांनी तिला जवळपास २ लाख रुपयाचे दागिने दिले जे तिने सासरच्याकडे विश्वासाने ठेवायला दिले. तसेच बेड, गादी, कुलर आणि इतर वस्तूही सासरच्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच सासूने तुला दहा जणांनी वापरून टाकलेला कचरा आहेस, तुझे वागणे चांगले नाही, तू रंगीली आहेस असे बोलायला सुरुवात केले ज्याला सासऱ्यांचाही पाठिंबा होता. वसंतसह सासू-सासरे, दिर, जाव हे गाडी घेण्यासाठी माहेरहून ५ लाख आणण्याचा तगादा लावत होते. सुनिताने दिलेल्या तक्रारीत वसंत तिला पुण्यातील बदनाम वस्ती असलेल्या बुधवार पेठेत घेऊन गेला. तिथे २०० ते ५०० रुपयात झोपण्यासाठी बाया भेटतात तू पण तशीच दिसतेस असे बोलून हिणवले. तसेच सुनीताने घरी असल्यावर मेकअप केला तर तिला बारमधील बाईची उपमा देत तिनेही तसेच काम करावे असे म्हणत त्याने तिचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप आहे. वसंत तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने ऑगस्ट २०२३ मध्ये तिच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींची समजूत काढली. वसंतचे बाहेर वेगवेगळ्या मुलींशी संबंध असल्याचे त्याने सांगत त्याच्या फोनच्या वॉलपेपरवर त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो ठेवले होते. तसेच तुझ्याहून चांगल्या मुली मला भेटतील असेही सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. हा सगळा प्रकार तिच्या आई-वडिलांनी लग्नात जास्त खर्च केला नाही तसेच अनैतिक संबंधांबाबत तिने जाब विचारला म्हणून झाल्याचे सुनीताचे म्हणणे आहे. वसंतची पहिली पत्नी ही चारित्र्यहीन असल्याने त्यांचा घटस्फोट झाल्याचे सासरच्यांनी सुनीताच्या कुटुंबीयांना सांगितले होते. एकंदर या सगळ्या त्रासाच्या विरोधात तिने पोलिसात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: If you put on makeup you look like those women Wife runs to police against husband 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.