Join us  

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल; भाजपाच्या 'या' ज्येष्ठ नेत्यानं केलं होतं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 10:09 AM

मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती तुटली.

मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्यासाठी पुढील काही तास महत्वाचे ठरणार आहेत. शिवसेना आपल्या मागण्यांवर ठाम राहणार की सत्ता स्थापनेसाठी भाजपासोबत जाणार हे कळणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं शिवसेना नेते संजय राऊत सांगत असले तरी भाजपाही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. 

शिवसेना-भाजपा युती गेल्या २५ वर्षापासून एकत्र आहे. स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी एकत्र आलेली ही युती राज्यात अस्तित्वात आली. हिंदुत्वाचा मुद्दा हा दोन्ही पक्षाचा एक अजेंडा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत युतीमध्ये शिवसेना ही मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. ज्या ज्यावेळी शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या त्यावेळी मुख्यमंत्री असो वा विरोधी पक्षनेते पद शिवसेनेने आपल्याकडेच ठेवलं आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षाची युती झाली होती. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. त्यावेळी भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते की, केंद्रात नरेंद्र अन् राज्यात उद्धवजी हे आम्हाला चालणार नाही. उद्धव ठाकरे हे शिवसेना-भाजपाचेच आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे राज्यात मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल असं विधान भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. 

मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती तुटली. दोन्ही पक्षाने वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या. दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीच्यावेळी गापीनाथ मुंडे हयात नव्हते. या निवडणुकीत भाजपाला १२२ जागा तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्याने राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आला. शिवसेना-भाजपा यांनी युती करुन राज्यात ५ वर्ष सत्ता हातात घेतली. मात्र अनेकदा सत्तेत राहूनही शिवसेनेने सरकारविरोधात भूमिका घेतली. अशातच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येत दोन्ही पक्षांनी युती केली. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचं समसमान वाटप करण्यात यावं असं ठरलं होतं हा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे जे ठरलं तसं करा ही आग्रही मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

महत्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री शिवसेनेचाच; प्रस्ताव आला नाही अन् पाठवणारही नाही - राऊत फडणवीस-ठाकरेंच्या मध्यस्थीसाठी खास व्यक्ती लागली कामाला; आता तरी ठरणार का सत्ता वाटपाचा फॉर्म्युला?

जर कुणीच मागे हटायला नाही तयार; मग कसं बनणार महायुतीचं सरकार?  मुख्यमंत्रिपद भाजपकडेच,शिवसेनेला निम्मी मंत्रिपदे; सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार

दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध

टॅग्स :भाजपाउद्धव ठाकरेशिवसेनागोपीनाथ मुंडे