Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल, तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार; ऑनलाइन बुकिंग साइटवर गुन्हे शाखेची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:54 IST

ऑनलाइन बुकिंग साइटवर गुन्हे शाखेची नजर असून ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालणाऱ्यांना  हॅप्पी न्यू इयर कोठडीत साजरे करावे लागणार आहे.

मुंबई : थर्टी फर्स्ट, नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने गस्त वाढवली आहे. ड्रग्जचे सेवन करणाऱ्यासह तस्करी, पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. ऑनलाइन बुकिंग साइटवर गुन्हे शाखेची नजर असून ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालणाऱ्यांना  हॅप्पी न्यू इयर कोठडीत साजरे करावे लागणार आहे.

शहरातील कुलाबा, गिरगाव, मरिन लाइन्स, वरळी, दादर, वांद्रे, खार, जुहू, सांताक्रुझ, अंधेरी, ओशिवरा, मालाड, मढ, मार्वे, गोराई अशा उच्चभ्रू वस्तीत असलेले पब, रेस्टॉरंट, पंचतारांकित हॉटेलकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी इव्हेन्ट कंपन्या पार्ट्यांचे आयोजन करतात. यासाठी अमली पदार्थ विक्रीची ठिकाणे, कोडवर्ड आणि रेव्ह पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी सोशल मीडिया आणि ईव्हेन्ट ऑर्गनायझर कंपन्यांच्या साइटसह अन्य सोशल नेटवर्किंग साइट व पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरेंट आणि पब यांच्या ऑनलाइन बुकिंग साइटवर गुन्हे शाखेची नजर आहे. 

 ड्रग्जसाठी नवे कोडवर्ड‘एक मीटर कपडा दो’ म्हणजे एक किलो एमडी, ‘एक पॉट’ म्हणजे एक किलो गांजा, ‘आईज’ म्हणजे एम्फेटामाइन, चरससाठी क्रीम, हेरॉईनसाठी जादू की पुडिया, ‘स्मँक’ म्हणजे हेरॉईन, ‘एक चिबा’ म्हणजे एक किलो चरस तसेच विविध कोडवर्डचा वापर होताना दिसतो.

कुरियर कंपन्या रडारवरकुरियर कंपनीद्वारे पाठविण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपविण्यात आले होते. पहिल्यांदाच अशाप्रकारे तस्करीचे नवे फंडे समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे यात कुरियर कंपन्याचा काही सहभाग आहे का? याबाबत यंत्रणा अधिक तपास करत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Police Crackdown on New Year's Eve Drug Use

Web Summary : Mumbai police increase vigilance against drugs for New Year's Eve. Online booking sites are monitored. New drug code words are identified. Courier companies are under investigation for drug parcels.
टॅग्स :31 डिसेंबर पार्टीपोलिस