Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: खरा 'हिंदुत्ववादी' असता तर जिन्नांना गोळी घातली असती, गांधींना का मारलं?, संजय राऊतांचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 13:16 IST

शिवसेनेचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे आणि हिंदुत्त्ववादवर आज रोखठोक विधान केलं आहे.

मुंबई-

शिवसेनेचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे आणि हिंदुत्त्ववादवर आज रोखठोक विधान केलं आहे. पाकिस्तानची मागणी तर जिन्ना यांनी केली होती. त्यामुळे जर कुणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं गांधींना नव्हे, जिन्ना यांना गोळी घातली असती, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"जर कुणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं जिन्नांना गोळी घातली असती. गांधींना का मारलं?. जिन्नांनी पाकिस्तानची मागणी केली होती. ज्यांनी देशाचं विभाजन केलं आणि पाकिस्तानची मागणी केली म्हणजेच जिन्ना यांना गोळी घातली पाहिजे होती. जर तुमच्यात हिंमत होती तर जिन्ना यांना गोळी घातली असती. ते एक देशभक्तीपर कृत्य ठरलं असतं. एका फकिराला गोळी घालणं ठिक नव्हतं. त्यांच्यावरील हल्ल्याचा आज जगभरात निषेध होतो. त्याचं दु:ख आज संपूर्ण जगाला आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'हिंदुत्ववादी' शब्दाचा वापर करून महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक खास ट्विट केलं. "एका हिंदुत्ववाद्यानं महात्मा गांधी यांना गोळी घातली होती. आज सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटतं की गांधीजी राहिले नाहीत. पण जिथं सत्य आहे तिथं आजही बापू जिवंत आहेत", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. याच ट्विटबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी जिन्ना यांना गोळी घातली असती तर तो खरा हिंदुत्ववादी ठरला असता असं रोखठोक विधान केलं. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराहुल गांधीमहात्मा गांधी