आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना तांत्रिक अडचणींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 03:52 AM2020-10-04T03:52:53+5:302020-10-04T03:53:00+5:30

विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार

Idols final year exams affected by technical difficulties | आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना तांत्रिक अडचणींचा फटका

आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना तांत्रिक अडचणींचा फटका

Next

मुंबई : परीक्षेची वेळ झाली मात्र अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या डिवाइसवर परीक्षेची लिंकच आली नाही. अनेकांना लिंक आली मात्र लॉगइनच न झाल्याने परीक्षा देऊ शकले नाहीत. अशा एक ना अनेक तांत्रिक अडचणींनी हैराण झालेल्या आयडॉलच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या जवळपास हजार विद्यार्थ्यांना शनिवारी पहिल्याच पेपरला मुकावे लागण्याचा प्रकार घडला.

ज्या विद्यार्थ्यांची तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा हुकली त्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी, विद्यार्थी-पालकांनी विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षांसाठी नेमलेल्या एजन्सीमुळे मनस्ताप झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ज्या तृतीय वर्ष बीकॉमच्या विद्यार्थ्यांना शनिवारी परीक्षा देता आली नाही त्यांची परीक्षा ९ आॅक्टोबर रोजी व तृतीय वर्ष बीएची ज्यांची परीक्षा हुकली त्यांना १४ आॅक्टोबर रोजी होणाºया परीक्षांना बसता येणार आहे. परीक्षेच्या लिंकचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड हा २४ तास अगोदर विद्यार्थ्यांना पाठविणे आवश्यक असतानाही शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना कोणताही लॉगइन आयडी व पासवर्ड मिळालेला नव्हता.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महत्त्वाच्या असताना सुरुवातीपासून त्यात लक्ष का घातले गेले नाही? मॉक टेस्टदरम्यान या सगळ्याची चाचणी का झाली नाही? ज्या खाजगी एजन्सीला परीक्षांचे कंत्राट देण्यात आले आहे, त्यांच्यावर या सगळ्या गोंधळासाठी चौकशी करून कारवाई करावी.
-संतोष गांगुर्डे, उपाध्यक्ष, मनविसे

Web Title: Idols final year exams affected by technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.