Join us  

परळीतून मीच जिंकणार, धनंजय मुंडेंच्या उमेदवारीनंतर पंकजांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:48 AM

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी स्थापन केलेल्या काँग्रेस (एस) ला 1980 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भरभरून यश मिळाले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. जिल्ह्यातील सहापैकी बीड, माजलगाव, परळी, केज आणि गेवराई या पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित करून पवारांनी त्यांना कामाला लावले. याबाबत पंकजा मुंडेंनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, मला आगामी निवडणुकांची अजिबात धास्ती नसून आमच्या विरोधकांनीच त्याची धास्ती घेतल्याचं दिसून येतंय, असे पंकजा यांनी म्हटले आहे. परळी विधानसभेतून माझाच विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.   

मी परळीत निवडूण आलेली आमदार आहे, मला कुठेही धास्ती वाटायंच काम नाही. लोकसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला असून माझ्या विधानसभा मतदारसंघातही ते मायनसमध्ये आहेत. मी गेल्या 5 वर्षात मोठा निधी मतदारसंघात आणला असून जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे परळीतून यंदाही मीच विजयी होणार, असा विश्वास पंकजा यांनी बोलून दाखवला. तसेच निवडणुकीची धास्ती मला नाही, तर त्यांनाच वाटायल्याची दिसून येतंय. कारण, ज्या पद्दतीने ते कामाला लागले आहेत, त्यावरुन ते स्पष्टच दिसतंय, असेही पंकजा यांनी म्हटलं आहे.  

शरद पवारांना साथ देणारा जिल्हा म्हणून तशी बीड जिल्ह्याची ओळख. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी स्थापन केलेल्या काँग्रेस (एस) ला 1980 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भरभरून यश मिळाले. सातपैकी बीड, माजलगाव, गेवराई, चौसाळा आणि केजमध्ये पवारांच्या पक्षाने बाजी मारली. आष्टीमध्ये अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे तर रेणापूर मतदारसंघात भाजपाचे गोपीनाथ मुंडे विजयी झाले होते. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्यारितीने जिल्ह्यात वाढवलं. राष्ट्रवादीने जिल्ह्यात सत्ता मिळवली होती, पण गेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा सगळीकडेच पराभव झाल्याचे पंकजा यांनी म्हटले आहे. पवार यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांची घोषणा केली, यावर बोलताना पवारसाहेबांचा बीडवर अधिक प्रेम राहिलंय, असा उपरोधात्मक टोलाही पंकजा यांनी लगावला. 

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडेबीडमुंबईराजकारणविधानसभा निवडणूक 2019