Join us  

...यापुढे कुणालाही बोट देताना मला विचार करावा लागेल - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 4:37 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एका सभेत म्हणाले होते, मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो. तेव्हा मला आश्चर्य वाटले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एका सभेत म्हणाले होते, मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो. तेव्हा मला आश्चर्य वाटले. माझे बोट धरून राजकारणात येणारा राजकारणात आल्यावर असे वागत असेल, तर यापुढे मला एखाद्यासमोर बोट पुढे करताना विचार करावा लागेल, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना काढला.

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यासाठी बोरीवली पश्चिम येथे शनिवारी पवार यांची सभा झाली. ते म्हणाले, दिलेली किती आश्वासने पूर्ण केली? याचा हिशेब भाजप सरकारने द्यायला हवा. पंतप्रधान जनतेच्या हिताची कामे करण्यापेक्षा मागच्या सरकारने काय केले हेच सांगत असतात. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी पंतप्रधानांसारखेच वागावे.

ऊर्मिला मातोंडकर म्हणाल्या, खासदार गोपाळ शेट्टी सांगतात की, आत्महत्या करणे ही आजची फॅशनच झाली आहे. ख्रिश्चन बांधवांनी या देशासाठी काही केलेले नाही. मला येथील मराठी मते नाही मिळाली तरी चालतील असे बोलणाऱ्या शेट्टी यांना आता मते मागताना काहीच वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :लोकसभा निवडणूकशरद पवारनरेंद्र मोदीउर्मिला मातोंडकर