Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sheena Bora Case : 'मी क्षमा करायला सुरुवात केलीय'... जेलमधून बाहेर येताच इंद्राणी म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 20:14 IST

Sheena Bora Case : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंद्राणीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी फक्त मोकळा श्वास घेण्यासाठी आले आहे, कारण गेल्या सात वर्षांपासून मी हे करू शकले नाही.

इंद्राणी मुखर्जी  (Indrani Mukharjee) शुक्रवारी संध्याकाळी भायखळा महिला कारागृहातून बाहेर पडली. मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी ते सहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होती. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court)  बुधवारी या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी हिची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. तुरुंगातून (Jail) बाहेर आल्यानंतर इंद्राणीने प्रसारमाध्यमांशी (Media)  संवाद साधताना सांगितले की, मी फक्त मोकळा श्वास घेण्यासाठी आले आहे, कारण गेल्या सात वर्षांपासून मी हे करू शकले नाही.'न्यायव्यवस्थेवरील माझा विश्वास वाढला'इंद्राणी म्हणाली की, भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास वाढला आहे. न्यायव्यवस्थेवर प्रत्येकाचा विश्वास असला पाहिजे, ती न्याय्य व्यवस्था आहे. ती म्हणाली, ती एक पुस्तक लिहित आहे, पण ते तुरुंगातील जीवनावर नाही. जेव्हा ते प्रकाशनासाठी तयार होईल, तेव्हा तुम्हाला कळेल की त्यात काय लिहिले आहे, असे मुखर्जी म्हणाले. मुखर्जी म्हणाले की, मी खूप बदलले आहे. मी अधिक सहनशील झाले आहे. मी माफ करायला सुरुवात केली आहे. क्षमा आम्हाला मुक्त करेल.'तुरुंगात खूप काही शिकले'इंद्राणी मुखर्जी म्हणाली की, तिला तुरुंगात खूप काही शिकायला मिळाले. तुरुंगातील काहीजण कट्टर गुन्हेगारांसारखे दिसत होते, पण त्यांच्यातही काही चांगले होते. प्रत्येक वाईट व्यक्तीमध्ये नक्कीच काहीतरी चांगले असते. इंद्राणीने सांगितले की, सध्या ती तिची वकील सना रईस खान आणि एडिथ डे यांच्यासोबत एक कप कॉफी घेणार आहे. शीना जिवंत असल्याच्या मुद्द्यावर इंद्राणीने बोलण्यास नकार दिला. या प्रकरणी बोलणार नसल्याचे तिने सांगितले. त्यावर विचार सुरू आहे. या विषयावर काही बोलायचे असेल तर त्यांचे वकील बोलतील.काल सायंकाळी 5.30 वाजता इंद्राणी तुरुंगातून बाहेर आली आणि तेथून कारमध्ये निघून गेली. इंद्राणीचे वकील तुरुंगाबाहेर हजर होते. बाहेर आल्यावर इंद्राणीने मीडियाकडे पाहिलं आणि हसली. ट्रायल कोर्टाने गुरुवारी इंद्राणीला 2 लाख रुपयांचा बॉण्ड सादर करण्यास सांगितले होते.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जीशीना बोरा हत्या प्रकरणतुरुंग