‘मुंबई - पुणेदरम्यानच्या हायपरलूपला स्थगिती नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:17 AM2020-03-05T05:17:19+5:302020-03-05T05:17:27+5:30

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. मुंबई - पुणे दरम्यानच्या हायपरलूपला तर उपमुख्यमंत्री ...

'Hyperloop has no halt' | ‘मुंबई - पुणेदरम्यानच्या हायपरलूपला स्थगिती नाही’

‘मुंबई - पुणेदरम्यानच्या हायपरलूपला स्थगिती नाही’

Next

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. मुंबई - पुणे दरम्यानच्या हायपरलूपला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यकताच नसल्याचे सांगत लाल झेंडा दाखविला होता. प्रत्यक्षात मात्र हायपरलूप प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबविण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या आर्थिक तसेच इतर दायित्व, जमीन संपादन, सवलती, जोखीम विश्लेषण आणि नियोजन या अनुषंगाने महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरणाच्या स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू आहे, असे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले.
काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई-पुणेदरम्यान अतिवेगवान प्रवासासाठी सुमारे ७० हजार कोटी खर्चाचा हायपरलूप प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गहुंजे ते ओझर्डेदरम्यान साकारण्यात येणाऱ्या चाचणी ट्रॅकच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी ३ मे २०१९ रोजी पुणे जिल्हाधिकारी यांच्यासोबत दुबईतील एका कंपनीची बैठक झाली आहे. या बैठकीत हायपरलूप प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सदर प्रकल्प स्वीस चॅलेंज पद्धतीने सार्वजनिक खासगी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

Web Title: 'Hyperloop has no halt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.