मुंबई विमानतळावर 50 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक 'वीड' जप्त, सोने आणि हिरेही आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:04 IST2025-02-02T18:02:54+5:302025-02-02T18:04:00+5:30
कस्टम विभागाने आठ तस्करांनाही अटक केली आहे.

मुंबई विमानतळावर 50 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक 'वीड' जप्त, सोने आणि हिरेही आढळले
Mumbai Airport :मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 50 कोटींहून अधिक किमतीचे हायड्रोपोनिक विड, सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच कस्टम विभागाने आठ जणांना अटक केली आहे. 28 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान विशेष कारवाई ही जप्ती करण्यात आली.
During 28-31 Jan, 2025, the officers at CSMIA,Mumbai, seized suspected Hydroponic Weed about 50.116 Kg having Illicit M.V of approx. 50.116 Cr., Diamond weighing 551.10 Carat v/a ₹93.85 Lakh & Gold weighing 2.073 Kg provisionally v/a ₹1.549 Cr. across 06 cases. 08 pax arrested. pic.twitter.com/KZ8lQtNQHs
— Mumbai Customs-III (@mumbaicus3) February 1, 2025
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईविमानतळावर केलेल्या या विशेष कारवाईत 50.16 कोटी रुपये किमतीचे 50.11 किलो हायड्रोपोनिक वीड, 93.8 लाख रुपये किमतीचे हिरे आणि 1.5 कोटी रुपये किमतीचे 2.073 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हायड्रोपोनिक विड हे एक प्रकारची नशा आहे. हे गांजाच्या श्रेणीत येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला खूप मागणी आहे. त्यामुळेच त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.
On 01.02.25,Custom officers at CSMI Airport, Mumbai, seized suspected Cocaine of 1.649 Kgs having illicit market value of approx Rs.16.49 Cr concealed in body cavity as well as ingested by the passenger. 01 passenger arrested under the provisions of the NDPS Act. @cbic_indiapic.twitter.com/W5RCBRs5x3
— Mumbai Customs-III (@mumbaicus3) February 2, 2025
विमानतळावर तस्करी वाढली
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या महिन्यातच विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला होता. या कारवाईत विमानतळावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात घेतले होते. ते दोघे तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेत असताना रंगेहात पकडण्यात आले. तपासादरम्यान सोन्याचे वजन 6.05 किलो असल्याचे उघड झाले, ज्याची बाजारातील किंमत 4.84 कोटी रुपये आहे.