Join us  

हुश्श! मुंबई-पुणे तिसरी मार्गिका खुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 6:38 AM

प्रवाशांना दिलासा; बंद करण्यात आलेल्या एक्स्प्रेस पुन्हा सुरू

मुंबई : मागील तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद असलेली मुंबई-पुणे तिसरी मार्गिका खुली करण्यात आली आहे. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाला आहे. मुंबई ते पुणे या मार्गामधील बोर घाटात रेल्वे मार्गाचे नुकसान झाले होते. आता मध्य रेल्वे प्रशासनाने मंकी हिल ते नागनाथ येथील वाहून गेलेल्या मार्गात खांब उभारले आहेत. ओव्हर हेड वायर नवीन बसविण्यात आली आहे. नवे रेल्वे रूळ टाकण्यात आल्याने मुंबई-पुणे तिसरी मार्र्गिका सुरळीत झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई-पुणे तिसरी मार्गिका सुरू झाल्याने बंद एक्स्प्रेस पुन्हा सुरू केल्या आहेत. एलटीटी-विशाखापट्टणम, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड या एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. यंदा पावसाळ्यात मंकी हिल ते नागनाथ या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले. परिणामी, येथील मार्गिका बंद-चालूचा खेळ सुरू होता. सप्टेंबर-आॅक्टोबर २०१९ दरम्यान पडलेल्या पावसाने मंकी हिल ते नागनाथ स्थानकांमधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वे मार्ग वाहून गेला. रेल्वे रुळाखालील खडी, रेती वाहून गेली. त्यामुळे ३ आॅक्टोबरपासून तिसरी मार्गिका बंद करून दुरुस्ती काम करण्यात आले.

असे झाले काम४० कर्मचाऱ्यांचे २४ तास युद्धपातळीवर काम केले. क्रेनने गर्डर टाकण्याचे कामही याचा कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यासाठी ८० टन स्टील सामग्री, ३५० ट्रक दगड, सुमारे १०० ट्रक सिमेंट वापरण्यात आले.असा आहेबोर घाटच्एकूण बोगद्यांची संख्या - ५२च्बोगद्यांची एकूणलांबी - १४ किमीच्बोर घाटात प्रमुखपूल - ८च्दररोज धावणाºया मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजरची संख्या - ७४च्दररोज धावणाºया मालगाड्यांचीसंख्या - १८च्बोर घाटातील स्थानकांची नावे - कर्जत, पलासधारी, जामब्रंग, ठाकूरवाडी, नागनाथ, मंकी हिल, खंडाळा, लोणावळा 

टॅग्स :मुंबईपुणेरेल्वे