लालबागमध्ये महारक्तदान शिबिरास तरुणांचा भरघोस प्रतिसाद 

By पूनम अपराज | Published: January 24, 2021 05:57 PM2021-01-24T17:57:53+5:302021-01-24T17:58:31+5:30

Blood Donation Camp : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासू लागल्याने मंडळाने दोनदा रक्तदान शिबीर राबवल्याचे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी संदीप सावंत यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

The huge response of the youth to the blood donation camp in Lalbaug | लालबागमध्ये महारक्तदान शिबिरास तरुणांचा भरघोस प्रतिसाद 

लालबागमध्ये महारक्तदान शिबिरास तरुणांचा भरघोस प्रतिसाद 

Next
ठळक मुद्देविशेष म्हणजे या शिबिरात जमा झालेल्या रक्तसाठ्याचा काही भाग वाडिया, सर जेजे रुग्णालय, सर जेजे महानगर, प्रिन्स अली खान, केईएम, नायर आणि जसलोक रुग्णालयातील रक्तपेठ्यांना देण्यात आला.

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने आज महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच कोरोनाची नाजूक परिस्थिती असताना जून महिन्यात देखील रक्तदान शिबीर या मंडळाने राबवले होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासू लागल्याने मंडळाने दोनदा रक्तदान शिबीर राबवल्याचे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी संदीप सावंत यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

विशेष म्हणजे या शिबिरात जमा झालेल्या रक्तसाठ्याचा काही भाग वाडिया, सर जेजे रुग्णालय, सर जेजे महानगर, प्रिन्स अली खान, केईएम, नायर आणि जसलोक रुग्णालयातील रक्तपेठ्यांना देण्यात आला. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने म्हणजेच मुंबईचा राजा मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिरात ऐकून १५०० रक्तदाते सामील झाले होते. मात्र. त्यापैकी ११५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. काही रक्तदाते काही कारणास्तव रक्तदान करू शकले नाही. या रक्तदात्यांना मंडळातर्फे भेटवस्तू स्वरूपात ज्युसर देण्यात आले. हा भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम साईबाबा पथ म्युनिसिपल शाळेत आयोजित करण्यात आला होता असून यंदाचे ९३ वे वर्ष होते असल्याचे संदीप सावंत यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरात प्रामुख्याने तरुणाईचा उत्साह पाहण्यास मिळाला असल्याचे देखील पुढे सावंत यांनी सांगितले.

Web Title: The huge response of the youth to the blood donation camp in Lalbaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.